Book Online Tickets for Shivneri Fort Trek - 13th July, Pune. किल्ल्याची ऊंची: ३५०० / Height of the Fort: 3500 ft.
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररा

Shivneri Fort Trek - 13th July

 

  • Heaven Treks

    या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल? 1. पु...णे ते पुणे प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण आमच्यासोबत ट्रेक का? या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन या कार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे.

    Show More

    Sale Date Ended

    INR 799
    Sold Out

Invite friends

Contact Us

Page Views : 61

About The Event1

किल्ल्याची ऊंची: ३५०० / Height of the Fort: 3500 ft.

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग / Type of the Fort: Hill Fort
डोंगररांग: नाणेघाट / Fort Range: Naneghat
जिल्हा: पुणे / District: Pune
श्रेणी: मध्यम / Difficulty: Medium
 
या ट्रेक मध्ये आपल्याला काय मिळेल?
1. पुणे ते पुणे प्रवास , 2. प्रथमोपचार पेटी, 3. चहा / कॉफी, 4. १ वेळचा नाष्टा, 5. १ वेळचे जेवण 

आमच्यासोबत ट्रेक का?
या ट्रेक मधील नफा हा किल्ले संवर्धन व पर्यावरण संवर्धन या कार्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासोबत किल्ल्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण करणे.
 

इतिहास : 

शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय अनारक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. 
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

 

शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमधे शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरीचालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ला जीजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न राजे शिवाजीने केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

 
सोबत काय घ्याल: एक दिवसीय ट्रेक / What You Should Carry: One Day Trek
  1. पाण्याची बाटली (अत्यावश्यक) / Water Bottle (Important)
  2. ओळखपत्र (आवश्यक माहितीआणि फोटोसह) / Identity Proof with a Passport Size Photo
  3. टोपी / Cap
  4. ट्रेकिंग बूट किंवा चांगली ग्रीप असेल असे बूट अत्यावश्यक  / Sport Shoes with Good Grip
  5. औषधे चालू असल्यास ती सोबत घ्यावी / Essential Medicines
  6. कोरडा खाऊ (प्राधान्याने अधिक बिस्किटे, राजगिरा, चुरमुर्यांचा चिवडा, सुका मेवा आणि कमी तेलकट वस्तू) / Snacks as Needed
  7. पावसापासून आपले संरक्षण करणारे कपडे छत्री / रेनकोट / Raincoat 
  8. कपडे एक किंवा दोन जोड्या आवश्यक असल्यास / Extra Pair of Clothes 1 / 2 Pair as You Need 
  9. पैसे आपल्याला काही वयक्तिक घेण्यासाठी लागल्यास / Extra Cash if You Wish to Buy Something
  10. दिवा / मशाल (रात्रीच्या वेळी आवश्यक) / Torch, Good at Night
  11. पेन आणि नोटबुक / Pen & Notebook
  12. सुरक्षा साहित्य / Pocket Knife

More Events From Same Organizer

Similar Category Events